
कायम जो़डप्याला रोमॅण्टिंक डान्स करताना पाहिला असेल. मात्र एका व्यक्तीचा रोमॅण्टिक डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. हा व्हिडीओ थक्क करणारा असून व्हिडीओतील व्यक्ती त्याच्या प्रेयसीसोबत नव्हे तर चक्क मगरीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. विश्वास बसणार नाही मात्र ही गोष्ट खरी आहे.
मगरीच्या आजुबाजुलाही फिरण्याची कोणी हिंमत करत नाही मात्र ही व्यक्ती चक्क मगरीसोबत डान्स करतेय त्यामुळे सगळीकडेच या व्हिडीओची चर्चा होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून कोणालाच डोळ्यांवर विश्वास बसत नाहीय. एका व्यक्तीने पाण्यात उतरुन चक्क मगरीसोबत डान्स केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत एक व्यक्ती जंगली मगरीला गळाभेट करुन नाचताना पाहायला मिळत आहे. ही व्यक्ती कमरेभर पाण्यात उतरुन मगरीसोबत रोमॅण्टीक डान्स करताना दिसत आहे. मगरीच्या अगदी जवळ असणारी व्यक्ती अजिबात घाबरलेली दिसत नाही. मगर पण त्या व्यक्तीसोबत दिसत असून तिने त्या व्यक्तीला अजिबात काही नुकसान पोहोचवलेले नाही.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ outofcontextanimals नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहीलेय, फक्त फ्लोरीडातच एका व्यक्तीला मगरीसोबत नाचताना पाहू शकता. या व्हिडीओवर एक व्यक्ती मगरीसोबत डान्स, करताना दिसली अशी ओळ लिहीली आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 68 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले. हा व्हिडीओ फार धक्कादायक आहे.






























































