
चीनमधील दोन रोबोमधील लढाईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. न्यूजवीकच्या अहवालानुसार, ही घटना चीनमधील शेन्झेन येथे जगातील पहिल्या पूर्ण-आकाराच्या मानवाकृती रोबोचा समावेश असलेल्या अल्टिमेट रोबोट नॉक-आउट लेजेंड्स या स्पर्धेत व्हाईट इगलने मॅटाडोर नामक एका रोबोला एक जोरदार लाथ मारली ज्यामुळे मॅटाडोरचे डोके धडापासून वेगळे झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळीही रोबोने लढाई सुरू ठेवली. डोक्याचे मोठे नुकसान होऊनही, मॅटाडोर लढत राहिला. दोन्ही रोबोट्स एकमेकांवर हल्ला करत राहिले. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही चकित झाले. व्हाईट ईगलने ती लढाई जिंकली. रोबोटने नाच करून आणि विजयाची पोझ देऊन आपला विजय साजरा केला.

































































