
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदुस्थानचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावन येथे संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. महाराजांचे आशीर्वाद घेत असलेल्या या जोडप्याचा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना भुरळ घालत आहे. प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी विराट आणि अनुष्का राधाकेलीकुंज आश्रमात पोहोचले. ते मथुरा येथील हॉटेल रेडिसनमध्ये थांबले होते. याआधी त्यांनी 4 जानेवारी 2023 आणि 10 जानेवारी 2025 रोजी भेट दिली होती.