
विराट कोहलीने आपली कसोटी कारकीर्द गाजवल्यानंतर 12 मे 2025 रोजी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळेच विराटच्या जगभरातील चाहत्यांना धक्का बसला होता. त्याने आता निवृत्तीचं मजेशीर कारण सांगितलं आहे.
विराट कोहली पत्नी अनुष्कासह सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील सामना बघण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला कसोटी निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तसेच त्याला सर्वजण मैदानावर मिस करत असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. तेव्हा विराट कोहली म्हणाला की, “मी माझ्या दाढीला दोन दिवसांपूर्वी कलर मारला आहे. जेव्हा तुम्हाला दर चौथ्या दिवशी दाढीला कलर मारावा लागत असेल, तेव्हा समजून गेलं पाहिजे की आता वेळ आली आहे.” अशा मजेशीर अंदाजात त्याने निवृत्तीच्या प्रश्नावर उत्तर दिल. यावेळी विराट कोहली सोबत रवी शास्त्री सुद्धा होते. यावेळी त्याने बोलत असताना रवी शास्त्री यांचे आभार मानले. तसेच रवी शास्त्री माझ्या संपूर्ण प्रवासात महत्त्वपूर्ण भाग राहिले आहे. माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम असेल, अशा भावना त्याने रवी शास्त्रींबद्दल बोलताना यावेळी व्यक्त केल्या.