त्याने चित्रपटांपासून दूरच रहावे…, बॉलीवूड निर्मात्याचा विराटला अजब सल्ला

विराट कोहली हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्रसिद्ध आणि दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मात्र, खेळाव्यतिरिक्त विराट व्यवसाय आणि अभिनयातही निष्णात आहे. त्याची स्वतःची कंपनी असताना तो बऱ्याचदा अनेक जाहिरातींमध्येही दिसतो, जिथे त्याचे अभिनय कौशल्य स्पष्टपणे दिसून येते. जाहिराती केल्यानंतर चित्रपटात काम करणे विराटसाठी नवीन गोष्ट नसेल. पण प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी त्याला एक इशारा दिला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूने चित्रपट करू नयेत, असे त्यांचे मत आहे. त्याने विशेषतः विराटला भविष्यात चित्रपटात न येण्याचा सल्ला दिला.

चित्रपट निर्माते मुकेश छाबरा यांनी नुकतेच YouTuber रणवीर अल्लाबडियाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विराट कोहलीबद्दल भाष्य केलं. मुकेश यांनी विराटचे खूप कौतुक केले. मात्र त्याला चित्रपटात न येण्याचा सल्ला दिला. विराट आधीपासूनच एक उत्तम क्रिकेटर आहे सोबतच तो एक चांगला कलाकारही आहे. याचबरोबर त्यांनी विराटच्या फिटनेसचंही कौतुक केलं. विराटने त्याचे यश योग्य पद्धतीने हाताळलं आहे, असे मुकेश छाबरा म्हणाले.

विराटचा डान्स आणि अभिनयही अप्रतिम असल्याचे मुकेश यांनी सांगितले. मात्र, विराट चतुर आहे, तितकासा हुशार नाही. त्यामुळे विराटने चित्रपटांपासून दूरच रहावे, असा सल्ला मुकेश यांनी विराटला दिला आहे. 5-6 वर्षांपूर्वी विराटला भेटल्याचे मुकेश छाबरा यांनी रणवीर अल्लाबडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.