विराट कोहलीने घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडीओ

1079

टीम इंडिया व न्यूझीलंडमध्ये दुसऱ्या टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवींनी टीम इंडियापुढे 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. किवींना या धावसंख्येला रोखणे हे गोलंदाजांचे मोठे यश आहे. मात्र यात टीम इंडियाता कर्णधाप विराट कोहली याने घेतलेल्या एका झेलची सध्या जरबदस्त चर्चा आहे. विराटने मुन्रोचा हवेत झेप घेत घेतलेला झेल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.

नवव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर गुप्टील बाद झाल्यानंतर त्यानंतर लगेचच त्याचा सलामीचा साथिदार मुन्रो देखील बाद झाला. मुन्रोने मारलेला शॉट चौकार जाईल असे वाटले असतानाच विराटने हवेत झेप घेत झेल घेतला. त्याच्या या जबरदस्त कामगिरीचे सध्या कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या