
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेता अजय देवगण याचे वडील विरू देवगण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
बॉलिवूडमध्ये ते स्टंट मॅन म्हणून प्रसिद्ध होते. 80 च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील अॅक्शन सीन विरू यांच्या दिग्दर्शनाखाली रचण्यात आले होते. 1999 सालचा हिंदुस्थान की कसम हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता.
Veeru Devgan,veteran action choreographer and father of Ajay Devgan passes away in Mumbai.More details awaited. pic.twitter.com/mHO4zqEvCc
— ANI (@ANI) May 27, 2019





























































