धरण भरले, विष्णुपुरी प्रकल्पाचा दरवाजा एका तासासाठी उघडला

1386

विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात काल पाऊस झाल्यामुळे आज दुपारी साडेबारा वाजता या प्रकल्पाचा दहाव्या क्रमांकाचा दरवाजा एका तासासाठी उघडण्यात आला आणि त्यानंतर दुपारी 1.45 वाजता तो बंद करण्यात आल्याची माहिती सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली.

विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात काल रात्री पाऊस झाल्याने हे धरण पुन्हा एकदा पूर्णपणे भरले. त्यामुळे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व सिंचन विभागाने चर्चा केल्यानंतर आज दुपारी साडेबारा वाजता धरणाचा दहाव्या क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला. दुपारी 1.45 वाजता हा दरवाजा बंद करण्यात आला आहे. गोदावरीच्या पात्रात यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या धरणाच्या पाणी सोडण्यामध्ये आमदुरा बंधारा पूर्ण भरला आहे. त्यामुळे त्याचेही एक गेट उघडे होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. नांदेड जिल्ह्यात पावसाची सरासरी 70 टक्क्यांपर्यंत आली असून, वरच्या भागाच्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरला आहे. त्यामुळे नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या