‘विस्टाडोम’चे बुकिंग वेळापत्रक बघूनच करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पावसाळय़ात कोकण व गोव्याचे निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी उत्सुक असणाऱ्या पर्यटक, प्रवाशांना दादर ते मडगाव जनशताब्दीला पारदर्शक विस्टाडोम डब्यांची जोड देण्यात आली आहे. मात्र मान्सूनमध्ये कोकण रेल्वेचे वेळापत्रक बदलत असल्याने नवीन बदलांप्रमाणे या विस्टाडोम डब्याचे आरक्षण करावे लागणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर मान्सूनचे वेळापत्रक लागू झाले आहे. पावसाळय़ात गाडय़ांचा वेग कमी होत असल्याने दरवर्षीपासून हा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत वेगमर्यादा कमी असल्याने जनशताब्दी एक्प्रेसला जोडलेल्या विस्टाडोम (पारदर्शक) डब्यासाठीचेही वेळापत्रक काही प्रमाणात बदलले जाणार आहे. त्यासाठी १२ जून ते २४ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर अशा पद्धतीने दोन टप्प्यांत बदल केले आहेत.

१२ जून ते २४ सप्टेंबर विस्टाडोम

  • दादर ते मडगाव जनशताब्दी एक्प्रेस सोमवार, गुरुवार, शनिवार
  • मडगाव ते दादर जनशताब्दी एक्प्रेस मंगळवार, शुक्रवार, रकिवार

२५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर

  • दादर ते मडगाव जनशताब्दी एक्प्रेस सोमवार, गुरुवार, शनिवार
  • मडगाव ते दादर जनशताब्दी एक्प्रेस मंगळवार, शुक्रवार, रकिवार