
सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठल भक्तीवर अभंगरचना करणाऱया कान्होपात्रा या इ.स.च्या 15 व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिह्यातील पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांचा जन्म एका गणिकेच्या पोटी झाला. पण पूर्वपुण्याईमुळे कान्होपात्रेला लहानपणापासुनच विठ्ठलभक्तीची ओढ होती. गावातील वारक्रयासमवेत ती पंढरपुरी जात असे त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे न्यावा असे विचार कधीही त्यांच्या मनात आले नाही. कान्होपात्रा यांनी मराठी ओव्या आणि अभंग लिहून विठ्ठलावर असणारी त्यांची भक्ती सांगितली आहे. त्यांनी लिहिलेले एकूण तीस अभंगे आजही गायले जातात. कान्होपात्रा यांचे 33 अभंग ’सकल संत गाथा’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत. संत कान्होपात्रा यांची ही रचना फार प्रसिध्द आहे – नको देवराया अंत आता पाहु। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।। हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले। मजलागी जाहले तैसे देवा।।



























































