Vivo चा ‘हा’ दमदार स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची कदाचित ही शेवटची संधी, 5 हजारांचा होतोय फायदा

दिग्गज स्मार्टफोन कंपनी व्हीओ (Vivo) चा व्हीओ व्ही 17 हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असणारा हा फोन कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लॉन्च केला होता. त्यावेळी याची किंमत 22 हजार 990 रुपये होती. मात्र आता हा फोन आजपर्यंतच्या सर्वात स्वस्त किमतीत विकला जात आहे.

अमेझॉनवर हा फोन तुम्ही 17 हजार 990 रुपयात घेऊ शकता. अर्थात तुमचा 5 हजार रुपयांचा फायदा होणार आहे. ऍक्सीस बँक, सिटी बँक, आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट किंवा डेबिड कार्ड वापरून तुम्ही 10 टक्के सुटही मिळवू शकता. ग्लेशियर ब्लू आणि मिडनाइट ओशन कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

वैशिष्ट्य –

– 6.44 इंचाचा E3 एस एमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले

– 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी (256 जीबी पर्यंत वाढवता येणार)

– 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाइड-अँगल, 2 मेगापिक्सल मोनोक्रोम आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आले आहे.

– 4500mAh ची दमदार बॅटरी

– इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर

आपली प्रतिक्रिया द्या