Pulwama attack तुम्ही प्रत्युत्तर द्या, रशिया सहकार्य करेल – पुतीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत दहशतवादाशी लढण्यासाठी रशिया सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन देणारा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात हिंदुस्थानचे 42 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हिंदुस्थान सरकारने या हल्ल्याचा तीव्र शब्दात विरोध करत दहशतवाद्यांना कठोर शासन केले जाईल अशी ग्वाही दिली. जगरातील देशांनी हिंदुस्थानला पाठिंबा दर्शवला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही या आपल्या भावाना व्यक्त केल्या.

पुतीन यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले की, ‘कश्मीरमध्ये शहीद झालेल्या हिंदुस्थानी जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. हा हल्ला अत्यंत निंदनीय असून पुलवामाच्या हल्लेखोरांना शिक्षा व्हायला हवी. दहशतवादविरोधी कार्यवाहीसाठी लागेल ती मदत रशिया करेल हे मी ठामपणे सांगतो, तसेच हिंदुस्थानच्या दुखवट्यात रशिया सहभागी आहेत. जखमींच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो.’