मोफत कॉलचा जमाना गेला, जिओ पाठोपाठ व्होडाफोन-आयडियाचाही ग्राहकांना दणका

रियायन्स जिओने ग्राहकांडून मिनिटाला 6 पैसे वसूल करण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) यासारख्या आघाडीच्या कंपन्यांकडे मोर्चा वळवला होता. परंतु आता व्होडाफोन-आयडियाचे सीमकार्ड वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आली असून 1 डिसेंबरपासून सर्व प्लान्स महाग होणार आहे.

व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून टॅरिफ शूल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी जिओने देखील आययूसीचा हवाला देत निशूल्क असणाऱ्या कॉलिंग सेवेसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली होती. आता तोट्यात असणाऱ्या व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) कंपनीने देखील टॅरिफ शूल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना याचा भूर्दंड बसणार आहे.

vodafone-idea1

व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) कंपनी दुसऱ्या तिमाहीत 50 हजार 921 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यासह एअरटेल या टेलिकॉम कंपनीला 23, 045 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे सरकार या टेलिकॉम कंपन्यांकडून जे एजीआर अर्थात एडजस्टेड ग्रॉस रिव्हेन्यू वसूल करते त्यामुळे कंपन्यावर बोजा वाढला आहे. म्हणून टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ शूल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

30 कोटी यूझर्स
दरम्यान, व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) कंपनीचे हिंदुस्थानमध्ये 30 कोटी युझर्स आहेत. कंपनीने टॅरिफ शूल्कात वाढ केल्याने याचा थेट प्रभाव या यूझर्सवर पडणार आहे. असे असले तरी कंपनीकडून हे शूल्क किती असणार आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु प्रिपेड आणि पोस्टपेड या दोन्ही यूझर्ससाठी ही वाढ असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या