‘Volkswagen’ची पहिली एसयूव्ही गाडी हिंदुस्थानात लॉन्च, वाचा किंमत व वैशिष्ट्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोक्सवॅगन (Volkswagen) इंडियाने आपली पहिली एसयूव्ही गाडी हिंदुस्थानमध्ये लॉन्च केली आहे. सात प्रवासी मावतील एवढी क्षमता असणाऱ्या या गाडीची किंमत 33.12 लाख रुपये एवढी आहे. गाडीमध्ये भरपूर स्पेस असल्याने मोठ्या कुटुंबासाठी ही गाडी उपयुक्त आहे.

volkswagen

वर्षाच्या सुरूवातीला फोक्सवॅगन इंडियाने पुढील दोन वर्षांत हिंदुस्थानच्या बाजारपेठेसाठी 4 एसयूव्हीची घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणे कंपनीने ‘टिगुआन ऑलस्पेस’ हिंदुस्थानी बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 33.12 लाख रूपये आहे. या गाडीचे डिझाईन खास असून भरपूर जागा असलेली अंतर्रचना, सुरक्षा उपाययोजना आणि आकर्षक बिल्ड दर्जा यांच्यामुळे ती ग्राहकांसाठी आदर्शवत ठरणार आहे.

volkswagen-1

वैशिष्ट्य –
1. 7 सीटर प्रीमियम कार असल्याने मोठे कुटुंबही सहज प्रवास करू शकते.

2. टिगुआन ऑलस्पेसमध्ये एक मोठा व्हीलबेस असल्याने जास्त जागा, लवचिकता आणि सामानाची जागा तयार होते.

3. 2.0 आय टीएसआय इंजिनसोबत बनवलेली असून ती 7 स्पीड डीएसजी 4 मोशन ट्रान्समिशनशी जोडलेली आहे.

4. यात 340 लिटरच्या आकारमानाइतके सामानाचे कंपार्टमेंट दिले जाते, जे 1274 लिटरपर्यंत वाढवता येते.

5. टिगुआन ऑलस्पेसमध्ये 7 एअरबॅग्स, एबीएस, ईएसपी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि इतर अनेक गोष्टी आहेत.

6. टिगुआन ऑलस्पेस ही गाडी सात रंगांमध्ये उपलब्ध आहे.