
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकूण 672 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दिल्लीतील 1 कोटी 47 लाख 86 हजार 382 मतदार या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. आम आदमी पार्टी आणि भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठsची केली असल्यामुळे दिल्लीत जागोजागी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नेत्यांनी घेतले देवदर्शन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी बजरंग बलीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी सुनीतादेखील उपस्थित होत्या. दुसरीकडे भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनीसुद्धा हनुमान मंदिर गाठले. त्यांनी मंदिरात विधिवत पूजाअर्चा केली.
विधानसभेच्या जागा – 70
एकूण उमेदवार – 672
मतदान केंद्रे – 13,750
मतदार – 1,47,86,382



























































