मतदार याद्यांच्या घोळाबाबत शिवसेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । नगर

मनपामध्ये मतदार यादीच्या घोळाचा विषय वाढत असताना आजपर्यंत 280 वरुन अधिक जणांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने याद्या करण्यात आल्यामुळे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आज तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्यांची हरकतच न घेतल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संबंधीतांची प्रशासनाबरोबर चांगलीच चकमक उडाली, सुमारे अर्धातास हा प्रकार सुरु होता. यानंतर शिवसेनेने या प्रकरणाकडे लक्ष देऊन राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करुन ‘आम्ही याचा पाठपुरावा करुन जनतेला मतदानापासून वंचित राहता येणार नाही याची दखल घेऊ’, अशी प्रतिक्रीया अनिल राठोड यांनी दिली.

मंगळवारी महानगरपालिकेमध्ये अधिकार्‍यांच्या समवेत नगरसेवकांची बैठक या विषया संदर्भात पार पडली. या वेळी दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, संभाजी कदम, काका शेळके, उपायुक्त प्रदिप पठारे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीच्या याद्या संदर्भात प्रशासनाकडे अनेक बाबी शिवसनेच्या पदाधिकार्‍यांनी मांडून या याद्यांमध्ये कशा प्रकारचा विषय घेतला गेला याद्या कशा पद्धतीने तयार करण्यात आल्या यासह विविध प्रश्‍न प्रशासनासमोर उपस्थित केले. हरकती एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्याने एक प्रकारे निवडणुकीच्या याद्यांचे घोळ झाल्याचे यावरुन निदर्शनास येत आहेत. आपण तात्काळ या प्रकरणाची सुनावणी घ्यावी कोणीही मतदानापासुन वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अनेक प्रभागातील नांवे दुसर्‍या प्रभागात गेली आहे याला जबादार कोण असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सर्वच पातळीवर सावळा गोंधळ मतदार याद्यांचा निर्माण झाल्याने नागरीक संभ्रमावस्थेत आहे. त्यात तुम्ही रेशनकार्ड आणा, मतदान कार्ड आणा असे म्हणत हरकतींना विरोध करत आहेत असेही प्रशासनाला यावेळी सुनावले, प्रशासनाने या प्रकरणासंदर्भात आम्ही निश्‍चितपणे मार्ग काएू असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.