मुंबईत महायुतीच्या उमेदवारांचा बोलबाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-shivsena

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रणरणत्या उन्हातही घराबाहेर पडून मतदान करत मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढून 55.29 टक्के मतदान केले. मुंबईतील सहाही मतदारसंघांत एकूण पाच कोटी 33 लाख 2 हजार 332 उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला असून या सर्व मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांचाच बोलबाला असल्याचे आडाखे बांधले जात आहेत. आता प्रतीक्षा आहे ती 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांची.

मुंबईत सर्वाधिक मतदान हे उत्तर मुंबईत नोंदविण्यात आले आहे. येथून गोपाळ शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देऊनही प्रत्यक्ष काँग्रेसचे नेते किंवा कार्यकर्ते प्रचारात न दिसल्याने शेट्टी हे पुन्हा एकदा मोठय़ा फरकाने निवडून येणार असे मानले जात आहे. दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर, शीव कोळीवाडा, वडाळा, माहीम या विधानसभांत 55 टक्क्यांच्या वर झालेले मतदान राहुल शेवाळे यांचा विजय सोपा करणार आहेत. उत्तर मध्य मुंबईत विलेपार्ले येथे झालेले 61 टक्के, कलिना 55 टक्के तर वांद्रे पूर्व तसेच कुर्ल्यातील मतदान पूनम महाजन यांच्या पथ्यावर पडणार आहे. उत्तर पूर्वमध्ये शिवसैनिक मनोज कोटक यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. मुलुंड, घाटकोपरमध्ये 60 टक्के तर विक्रोळी, भांडुप, घाटकोपरमध्ये 55 टक्क्यांवरील मतदानामुळे कोटक यांचा विजय सोपा झाला आहे.

दक्षिण मुंबईत सर्वात कमी 51.45 टक्के मतदान झाले असले तरी वरळी, शिवडी, भायखळा  येथे झालेले मतदान त्याचप्रमाणे मलबार हिलमध्ये झालेले 56.8 टक्के मतदान हे अरविंद सावंत यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर पश्चिम मुंबईत सर्वाधिक जोगेश्वरीत 60.36 टक्के झालेले मतदान दिंडोशी, गोरेगाव तसेच अंधेरी पूर्वेकडे झालेले मतदान गजानन कीर्तिकरांना भरघोस मतांनी निवडून येण्याचे अंदाज मानले जात आहेत.

  • बोरिवलीत सर्वाधिक मतदान 66.19 टक्के
  • कुलाब्यात सर्वात कमी 45.16 टक्के
  • पाच कोटी 33 लाख मतदारांनी बजावला हक्क

मतदारसंघ             टक्के

  • उत्तर मुंबई       60.00%
  • उत्तर पश्चिम     54.26%
  • उत्तर पूर्व       57.15%
  • उत्तर मध्य      53.67 %
  • दक्षिण मध्य    55.23%
  • दक्षिण मुंबई    51.45%

उत्तर मुंबई

मतदारसंघ टक्के

  • बोरिवली   66.19
  • दहिसर     62.39
  • मागाठणे   57.72
  • कांदिवली  55.71
  • चारकोप    60.80
  • मालाड पश्चिम 56.92
  • एकूण     60.00

उत्तर पश्चिम मुंबई

मतदारसंघ टक्के

  • जोगेश्वरी पूर्व 60.36
  • दिंडोशी    57.06
  • गोरेगाव    52.75
  • वर्सोवा     48.53
  • अंधेरी पश्चिम 50.16
  • अंधेरी पूर्व  57.31
  • एकूण     54.26

उत्तर पूर्व मुंबई

मतदारसंघ टक्के

  • मुलुंड       63.66
  • विक्रोळी    57.30
  • भांडुप      58.99
  • घाटकोपर पश्चिम    55.89
  • घाटकोपर पूर्व 61.27
  • मानखुर्द    47.08
  • एकूण     57.15

उत्तर मध्य मुंबई

मतदारसंघ टक्के

  • विलेपार्ले   61.19
  • चांदिवली  50.79
  • कुर्ला        51.29
  • कलिना     55.10
  • वांद्रे पूर्व    52.74
  • वांद्रे पश्चिम 52.45
  • एकूण     53.67

दक्षिण मध्य मुंबई

मतदारसंघ टक्के

  • अणुशक्तीनगर 55.98
  • चेंबूर        56.73
  • धारावी     48.09
  • शीव कोळीवाडा     53.79
  • वडाळा     59.63
  • माहीम     58.12
  • एकूण     55.23

दक्षिण मुंबई

मतदारसंघ टक्के

  • वरळी      51.98
  • शिवडी     52.62
  • भायखळा  54.56
  • मलबार हिल 56.08
  • मुंबादेवी    48.33
  • कुलाबा     45.16
  • एकूण     51.45