केरळम, आसाम, पद्दुचेरीत प्रचार तोफा थंडावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशाचे लक्ष पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. त्यातील केरळम, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये गुरुवार, 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.  या तीनही राज्यांत आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आसामात 126, केरळात 140 आणि पुद्दुचेरीत 30 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व जागांचा निकाल पश्चिम बंगाल आणि तामीळनाडू विधानसभा निवडणुकांनंतर 4 मे रोजी एकत्रित घोषित करण्यात येणार आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी आणि पश्चिम बंगालमध्ये 23 व 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.