
देखभाल दुरुस्तीचे काम ल टकल्यामुळे वाडा तालुक्यातील तीन ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बन्नाले आहेत. त्यामुळे या पुलांवर वाहनचाल कांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या तिन्ही धोकादायक पुलांमध्ये भिवंडी-वाडा-मनोर मार्गावर तानसा नदीवरील डाकीवली, वैतरणा नदीवरील गांधारे आणि पिंजाळ नदीवरील पाली पुलांचा समावेश आहे.
वैतरणा आणि तानसा या दोन नद्यांवर असलेले हे दोन्ही पूल ब्रिटिशकालीन असून त्यांची दुरुस्ती झालेली नाही. शिवाय या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे या दोन्ही पुलांची अवस्था दयनीय झाली आहे. या पुलांवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांची आवश्यक ती दुरुस्ती केलेले नाही. पुलांबरोबर या मार्गाची अवस्थाही दयनीय झाली आहे. रस्ता खड्यात गेल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे.
स्ट्रक्चर ऑडिट करा !
कुंडमळा येथे घडलेल्या पूल दुर्घटनेच पाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याची पुनरावृत्ती वाडा तालुक्यात घडू नये यासाठी प्रशासनाने या तिन्ही पुलांबाबत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील यांनी केली आहे.