
अमेरिकेतील प्रसिद्ध रिटेल कंपनी वॉलमार्ट 1 हजार 500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने नोकर कपात करण्याचा हा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. ही कर्मचारी कपात बेंनविले, अर्कांससमधील वॉलमार्टच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. तसेच कंपनीच्या ग्लोबल टेक्नोलॉजी टीमसह अमेरिकेतील अन्य कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.