हे करून पहा- हिवाळ्यात घर ऊबदार ठेवायचंय…

हिवाळ्यात घर ऊबदार ठेवण्यासाठी लगेच हिटर लावण्याऐवजी घरात काही साधे बदल करू शकता. दार-खिडक्यांभोवती असलेल्या लहान फटींमधून थंड हवा आत येते. दाराच्या खालच्या बाजूला कापडी गुंडाळी ठेवणे किंवा संध्याकाळी पडदे पूर्णपणे ओढणे उपयुक्त ठरते. जेवणानंतर थोडा वेळ स्वयंपाकघराचे दार उघडे ठेवल्यास ऊब इतर खोल्यांत पोहोचते.

संगमरवर किंवा टाईल्सवर पाय ठेवताच गारवा जाणवतो. लहानसा गालिचाही हा परिणाम कमी करतो. कापडी वॉल हँगिंग्स किंवा जाड पडदे भिंतींवर लावल्यास थंडीचा अडथळा निर्माण होतो. जाड पांघरूणे आणि थर लावलेली बेडिंग वापरावी.