असं झालं तर… – चष्म्याचा नंबर कमी करायचाय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वात आधी आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर, पालेभाज्या, आवळा, सुकामेवा आणि फळे खा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर 20 मिनिटांनी स्क्रीन टाइमनंतर 20 फूट दूर असलेली वस्तू 20 सेपंदांसाठी पाहात राहा. म्हणजेच 20-20-20 हा नियम फॉलो केल्यास फायदा होतो.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यांचे व्यायाम करा. डोळे फिरवणे, पापण्या जलद मिटणे आणि उघडणे तसेच दूरच्या वस्तूंवर लक्ष पेंद्रीत करा. व्यायामुळे डोळे निरोगी राहतात.

दर दिवशी पुरेशी झोप घेणे म्हणजेच 24 तासात किमान 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत मिळते.

डोळे असो की शरीरातील कोणताही अवयव यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या.