वर्धा येथील पुरात वाहून चारजणांचा मृत्यू

वर्धेत दोन वेगवेगळ्या घटनात मोठया नाल्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका मुलासह दोन महिलाव एका पुरुषाचा समावेश आहे. सेवाग्राम पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. वर्धा तालुक्यातील धोत्रा येथील नारायण पोहाने हे बैलगाडीने सावली येथे निघाले होते. तेव्हात्यांचा नातू वंदेश हिवरे (वय – 12) हा देखील त्यांच्याबरोबर होता. शुक्रवारी रात्री जोरदारझालेल्या पावसामुळे गोजी शिवारातील मोठा नाला तुडुंब वाहू लागला होता, दरम्यान त्यांनापाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी पुरात वाहून गेली, ज्यामध्ये या दोघांचीह मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचे मृतदेह हाती लागले.

आपली प्रतिक्रिया द्या