
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीस राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासाठी आता समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना पुढे सरसावली असून 51 हजाराचा निधी वारकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आले. सदरचा धनादेश प्रांताधिकारी सचिन ढोले यांचेकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, विठ्ठल म. वासकर, प्रभाकर दादा बोधले महाराज, मनोहर म. औटी, संपतराव म. कुंभारगावकर, नामदेव म. लबडे, बाळासाहेब म. ऊखळीकर, भागवत म. कबीर, निवृत्ती म. टेंभुकर, विवेकानंद म. गोसावी, सुदर्शन म. मंगळवेढेकर आदी उपस्थित होते.
























































