
लातूर जिल्ह्यात अभूतपूर्व अशी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे . जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या केवळ 52.13 टक्के पाऊस झालेला आहे. यापुढे मोठा पाऊस होईल आणि पाण्याची टंचाई दूर होईल अशी अपेक्षा राहिलेली नाही. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठीच्या उपाययोजना आखाव्यात अशी मागणी मात्र होत आहे.
कायम दुष्काळी जिल्हा असा ठसा लातूर जिल्ह्याच्या माथी लागला असून पावसाअभावी जिल्ह्यातील खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहे. रब्बी पिकाची पेरणी होईल किंवा नाही हेही सांगणे मुश्कील झाले आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 418 .14 मि.मी.सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या 52.13 टक्के पाऊस झाला असला तरी या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झालेली नाही अथवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढलेली नाही.
लातूर जिल्ह्यात आजपर्यंत पडलेल्या तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. लातूर तालुका 262.18 मि.मी. औसा तालुका 271.84 मि.मी. रेनापुर तालुका 406.38 मि.मी. उदगीर तालुका 404.88मि.मी. अहमदपूर तालुका 619.13 मि.मी. चाकुर तालुका 425.60 मि.मी.जळकोट तालुका 581.50 मि.मी.निलंगा तालुका देवणी तालुका 431.14 मि.मी. शिरूर अनंतपाळ तालुका 243.32





























































