
परभणी शहरासह जिल्हयात कोरोनाचा ससंर्गचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जाते. परंतु प्रत्यक्षात 15 दिवस उलटले तरीही परभणीकरांना पाणीपुरवठा केला जात नाही. किमान 10 दिवसाआड तरी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परभणीकरांच्या वतीने विभागीयआयुक्त सुनिल केंदरेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी शहराला गेल्या अनेक वर्षापासून 15 दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु आता लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना जास्त पाणी लागत आहे. किमान 10 दिवसाला तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मनपा आयुक्त व जिल्हिाधिकारी यांना या संदर्भात व्हॉट्सअॅपद्वारे मॅसेज पाठवले आहे. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. विभागीय आयुक्तांनी परभणी महानगर पालिकेस किमान 10 दिवसाआड पाणीपुरवठा देण्यासाठी आदेशीत करावे अशी मागणी केली आहे.






















































