लातूरमधील खरोळा येथे पाणीटंचाई; पाण्यासाठी घागरीच्या रांगा

कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत असताना लातूर जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. रेणापूर तालूक्यातील खरोळा येथे पिण्याच्या पाण्यासाठी घागरीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

लातूर जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. रेणापूर तालूक्यातील मौजे खरोळा येथे सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील बोअरवेल फक्त अर्धा तास चालतो. दोन तास बंद ठेवल्यानंतर पुन्हा अर्धातास पाणी येते. पाणी घेण्यासाठी नागरीक घागरीच्या रांगा लावत आहेत. कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागत असल्याने पाणी घेण्यासाठी प्रत्येकाला बोअरजवळ जाता येत नसल्याने घागरीच्या रांगा लावल्या जात आहे. त्यानंतर रांगेप्रमाणे पाणी घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यातच बोअर दोन तास बंद ठेवावी लागत असल्याने नागरिकांची अडचण होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या