
सामना ऑनलाईन । कन्नड
नगर परिषदेची पारदर्शक कारभारकडे वाटचाल सुरू असून, जीपीएस यंत्रणा असलेल्या घंटागाडीनंतर आता जलशुद्धीकरण केंद्र देखील सीसीटीव्हीच्या निगराणीत आणून तेथील सर्व प्रक्रिया नागरिकांना दिसावी यासाठी शहरातील सर्व नागरिकांना घरी बसून बघता यावे, अशी ऑनलाइन यंत्रणा कन्नड नगर परिषदेने राबविली आहे.शहराला ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. त्या फिल्टर प्लाण्टवरील यंत्रणा कसे काम करते, तुरटी मिसळले जाते किंवा नाही, फिल्टर यंत्रणा कार्यान्वित आहे किंवा नाही यासाठी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधा खुली करण्यात येत असल्याची घोषणा गटनेते तथा माजी अध्यक्ष संतोष किसनराव कोल्हे यांनी केली.
प्रभाग क्र. दोनमध्ये आयोजित जनसंवाद अभियानात ते बोलत होते. शहरात २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाची सांगता रविवार, ७ रोजी प्रभाग क्र. दोन मधील आदर्शनगर येथील समाज मंदिरात झाली. पुढे बोलताना. कोल्हे म्हणाले की, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होऊन समाधान झाले पाहिजे. पारदर्शक कारभार, नियमित स्वच्छता, नियमित पाणी आणि पथदिव्यांवरील वीज यासह गटारी, सिमेंट रस्ते, खुल्या जागेवर बगीचा, रिकाम्या प्लॉटवरील दुर्गंधी आदी सर्व बाबींवर नियमित लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, प्रभाग दोनचे शिवसेना नगरसेवक पंकज (बंटी) सुरे, कुसुम ठोकळ, काकासाहेब ठोकळ, नगरसेविका अनिता कवडे, नगरसेवक युवराज बनकर, अनिल गायकवाड, अस्लम पटेल, अथहर, रवींद्र राठोड, बाबासाहेब शिरसे, स्वाती पवार, कैलास जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगरसेवक बंटी सुरे यांनी कचराकुंडी बसविण्यात यावी आणि बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी केली. नागरिकांनी नियमित नाली स्वच्छता, नियमित पाणी आणि पथदिव्यांच्या समस्या मंडल्या.
नगराध्यक्षा स्वाती कोल्हे म्हणाल्या की, शहर कचराकुंडी मुक्त करत असून, प्रत्येक प्रभागनिहाय घंटागाडी सुरू करण्यात आलेली आहे. त्या घंटागाडीत जीपीएस यंत्रणा आहे.त्या घंटागाडीसाठी Track Appचा यूजर आयडी
KANNAD2017 आणि पासवर्ड KANNAD२०१७ याप्रमाणे असून, सर्व नागरिक गाडी कोठे आहे हे बघू शकता. तसेच पथदिवे त्वरित बसविण्याच्या सूचना संबंधित अधिकारी कर्मचाNयांना दिल्या. कामचुकर आणि अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक, निवृत्त पेन्शनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी समाज मंदिरास वॉल कंपाऊंड बांधून देण्याची मागणी केली.
मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी नागरिकांनी नियमित कराचा भरणा करावा, असे आवाहन केले. नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही दिली.यावेळी माधवराव अहिरे, कारभारी वेताळ, एस.ए. देशमुख, फकिरराव सोनवणे, देवपुरी गोस्वामी, दीपक ताठे, दिलीप शहरवाले, वसंत दळवी, अनिल खंबाट आशाबाई बिडाईत, लताबाई सोनार, उत्तमराव बिडाईत, सचिन शेलार, संतोष पवार, आकाश लोंढे, सुधाकर पवार, प्रा.प्रकाश ठाकरे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगरपालिकेचे अधीक्षक रवींद्र सोळुंके, प्रशांत देशपांडे, संजय सोनार, आसिफ खान, नाना गायकवाड, सत्वगुणा जोगदंड, नंदू चव्हाण, नंदू सरोदे, देवीदास पाटील, श्याम कनगरे, प्रतिभा कदम, के.जी.दुधे, बाजीराव थोरात, शेख खालेद, अझर खान, असिफ पठाण, नारायण कनगरे, जी.बी.इंगळे, रितेश बेद, दरोग रसूल, शहबाज सय्यद, सिद्धार्थ बनकर आदींची उपस्थिती होती.





























































