पाणीसाठा आवश्यक, दुरुस्ती कामे हाती घेण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी पावसाळी मोसमाची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील पाणी साठ्यातील गळती थांबविण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत आणि या प्रकल्पांमधून पावसाचे अधिकाधिक पाणी अडविण्यात यावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील धरणे, साठवण तलाव, कोल्हापुरी बंधारे, बाराज यांमधूनपाणी साठवले जाते. मात्र  अनेकदा  अशा प्रकल्पांमधील पाण्याच्या गळतीमुळे पुरेसा पाण्याचा साठा करणे शक्य होत नाही  असा अनुभव आहे. लातूर जिल्ह्यातील या प्रकल्पांमधून येत्या पावसाळ्यात अधिकाधिक पाणी अडवले जाईल आणि पाण्याची गळती होणार नाही यासाठी वेळीच संबंधित खात्याने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी सुचवले आहे.