
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
जिल्हा परिषदेच्या आठ प्रादेशिक नळपाणी योजनांसाठीचा दर आजच्या जलव्यवस्थापनच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. खासगी नळजोडणीसाठी पाणीपट्टीचा दर प्रतिकुटूंबाला अडीच हजार रुपये, सार्वजनिक नळजोडणीचा दर प्रतिकुटूंबाला 2 हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. गेले अनेक दिवस प्रादेशिक नळपाणी योजनेच्या दराचा विषय रखडला होता.
जि. प़. अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापनची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले़ त्यामध्ये जि. प. च्या 8 प्रादेशिक नळपाणी योजनांचा दर निश्चित करण्यात आला. पाणी पट्टीचा वार्षिक दर निश्चित करण्यात आला असून खासगी नळजोडणीसाठी प्रति कुटूंब अडीच हजार रुपये, सार्वजनिक नळजोडणीचा दर प्रतिकुटूंबाला 2 हजार रुपये आकारला जाणार आहे. पाणीपट्टीचा मीटर बसवला तर प्रतियुनिट 25 रुपये दर आकारला जाणार आहे. नवीन खासगी नळ जोडणीसाठी 3 हजार रुपये दर आकारण्याचे निश्चित करण्यात आले. सर्वानुमते हा दर मंजूर कंरण्यात आला. ना नफा ना तोटा या तत्वावर ही दरनिश्चिती करण्यात आली असून यापुर्वीच्या दरामुळे जि़प़ला तोटा सहन करावा लागत होता.
जिल्ह्यामध्ये आलेल्या पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणाच्या पाणी योजना बाधित झाल्या आहेत. काही ठिकाणी पाईप वाहून गेल्या आहेत. अशाबाधित योजनांची पाहणी कंरुन त्याचा अहवाल त्वरीत सादर कंरण्याच्या सूचना जि. प. अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. जि़प़च्या प्रादेशिक नळपाणी योजनेच्या देखभालीसाठी 9 जणांचा कंर्मचारी वर्ग होता. त्यांच्या वेतनाबाबतही आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्या कर्मचाऱ्यांना देखभालीच्या वसूलीमधूनच देखभालीचा खर्च देण्यात येणार असल्याची माहिती स्वरुपा साळवी यांनी दिली. या बैठकीला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, गटनेते उदय बने, जि़प़उपाध्यक्ष संतोष गोवळे, समाजकंल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला बाल कल्याण सभापती साधना साळवी, बांधकाम सभापती विनोद झगडे आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते़



























































