इम्रान खानची विनवणी युद्ध नको, चर्चा करू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
imran-khan

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

हिंदुस्थानच्या ‘हवाई स्ट्राईक’मुळे हादरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लोटांगण घातले असून विनवणीची भाषा सुरू केली आहे. युद्ध नको, चर्चेने प्रश्न सोडवू. सर्वच युद्धांमध्ये नेहमी वेळ चुकते आणि मनुष्यहानी मोठय़ा प्रमाणात होते, असे सांगत त्यांनी पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील ‘वॉर ऑन टेरर’चा दाखला दिला आहे.

Live Update:- India in action

इम्रान खान यांनी आपल्या देशाला उद्देशून भाषण केले. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. आत्ताची तणावाची स्थिती अशीच वाढत राहिली तर ती परिस्थिती माझ्याही नियंत्रणात नसेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नसणार आहे. त्यामुळे युद्ध नको. पुलवामामध्ये घडलेली घटना दुःखद असून, त्याची चौकशी करण्यास आणि दहशतवादावर चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचे तुणतुणे त्यांनी वाजवले. हिंदुस्थानने आमच्या हद्दीत येऊन कारवाई केली, त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानची दोन ‘मिग’ पाडली. त्यांचे दोन पायलट आमच्या ताब्यात आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.