‘सिंगल’ तरुणांची प्रेमव्यथा ट्रेंडिंगमध्ये, ट्विटरवर मीम्स-जोक्समधून व्यक्त होतंय दुःख

प्रत्येकाच्या आयुष्यात खास दिवस येतो, जेक्हा त्याला किंवा तिला स्वप्नातला राजकुमारी किंवा राजकुमार भेटते आणि प्रत्यक्ष प्रेमकहाणीला सुरुवात होते. अशाच लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहेत. लोकांनी जसजशा आपल्या लव्हस्टोरी सांगायला सुरुवात केली, तसं ट्वीटरवर ‘वुईमेटऑनट्वीटर’ हॅशटॅग ट्रेंड झालं. या ट्रेंडसोबत ज्यांचे लग्न झालेले नाही किंवा ज्यांना प्रेयसी नाही, अशा ‘सिंगल’ युवकांचे दु:ख सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

screenshot_2021-01-19-21-25-16-244_com-google-android-gm

‘वुईमेटऑनट्वीटर’ हॅशटॅगवर कालपासून अविवाहित तरुणांकडून मजेशीर डायलॉग शेअर होताना दिसत आहेत. खरं तर प्रेमकहाणी सांगण्यासाठी हा हॅशटॅग होता. मात्र अविवाहित युवकांनी त्याला वेगळंच रूप दिले आणि एकटं असण्याचं दु:ख मीम्सच्या माध्यमातून मांडायला सुरुवात केली. अनेक जण ‘हाल-ए-दिल’ सांगू लागले. हे प्रमाण एवढं जास्त होतं की ‘असा दु:खद हॅशटॅग ट्रेंड होत असेल तर जगण्यासाठी उरलं काय?’, असेही नेटकरी गमतीने म्हणू लागले.

आपली प्रतिक्रिया द्या