
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बोलत असतो. आपलं बोलणं कधी संपतच नाही. कुणी कमी बोलतं, कुणी जास्त. शब्दांची ताकद सारेच जाणतो. पण कधी विचार केलाय का, आपण दिवसाला किती शब्द बोलतो. लिंक्डईन इन्स्ट्रक्टर जेफ एनसेल यांच्या मते साधारणपणे एक व्यक्ती दिवसाला कमीत कमी सात हजार शब्द बोलते… कदाचित त्याहूनही जास्त… काय
ऐकून धक्का बसला ना…
दिवसभरात आपण अंदाजे सात हजार शब्द बोलतो. मग आयुष्यभरात एकूण किती शब्द बोलतो? प्रश्न कठीण वाटतो ना… पण याचे उत्तरही शोधण्यात आलंय. एखादी व्यक्ती आयुष्यात सरासरी 86 कोटी तीन लाख 41 हजार 500 शब्द बोलते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच सुमारे 86 कोटी शब्द बोलण्यात आपण आपलं आयुष्य खर्ची घालतो. ब्रिटिश लेखक आणि ब्रॉडकास्टार गेल्स ब्रॅन्ड्रेथ यांनी ‘जॉय ऑफ लेक्स’ या पुस्तकात याची माहिती दिली आहे. आयुष्यभरात एवढे शब्द बोलणे म्हणजे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे 20 खंड 14.5 वेळा वाचण्यासारखेच आहे.
























































