
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी सकाळी 10.30 न्यायालयात आता सुनावणी होणार आहे. मुंबईत काँग्रेसचे खासदार अहमद पटेल काँग्रेस आमदारांशी संवाद साधत आहेत. भाजपला हरवले पाहिजे असा निर्धार त्यांनी बैठकीत केला आहे.
अहमद पटेल काँग्रेस आमदारांशी बोलताना म्हणाले की, “आपण सर्व खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. 30 तारखेला आपलाच विजय होणार.” 30 तारखेला विधानसभेत बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे.
भाजपने आपल्याला आव्हान दिले आहे असे पटेल म्हणाले. तसेच आपल्या सगळ्यांना एकत्र रहायचे आहे. आपले मनोबल कमजोर होता कामा नये. आपल्याला खूप पुढे जायचे आहे. आपल्याला फक्त भाजपच्या मुख्यमंत्र्यानी नव्हे तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी आव्हान दिले आहे, त्यांना आपण हरवलेच पाहिजे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



























































