
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळण्यात आल्यावरून भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. मतदार यादीतून नाव वगळण्यास विरोध करण्यासाठी आपला पक्ष पुन्हा न्यायालयात जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीतून सुमारे ९१ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मतदार यादी सुधारण्याच्या प्रक्रियेवरून आपला मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपवर निशाणा साधताना बॅनर्जी म्हणाल्या की, ‘नावे वगळून तुम्ही तृणमूल काँग्रेसचा (TMC) पराभव करू शकणार नाही. नावे वगळण्याच्या या कृतीला विरोध करण्यासाठी आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ’.
भाजपला मतदान म्हणजे मासे, मांस आणि बंगाली भाषेचा त्याग! – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणुकीच्या प्रचारात भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ले करत आहेत. तर भाजपकडून देखील बॅनर्जी यांना प्रत्युत्तर देत लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या संस्कृतीचा, अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
पश्चिम बंगाल मधील बालागड येथे ममता बॅनर्जी निवडणूक प्रचार सभेसाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी भाषणातून तृणमूल काँग्रेसचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपवर जोरदार टीका. मात्र यावेळी भाजपवर टीकेची झोड उठवतानाच त्यांनी पश्चिम बंगालमधील संस्कृती आणि बंगाली अस्मितेचा विशेष उल्लेख करत जनतेला साद घातली आहे. भाजपला मतदान करणे म्हणजे मासे, मांस आणि बंगाली भाषेचा त्याग करण्यासारखे आहे, असे विधान ममता बॅनर्जी यांनी यावेळी केले.
Voting for BJP means giving up fish, meat, speaking in Bengali: Mamata at Balagarh poll rally. pic.twitter.com/qZ7ZxiLkjF
— Press Trust of India (@PTI_News) April 8, 2026
ममता बॅनर्जी यांच्या सभांना बंगाली जनतेचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.


























































