युद्धाची सुरुवात आम्ही करणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमधून कलम 370 हटकल्यापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढला आहे. केवळ चडफडण्याशिवाय पाकिस्तान दुसरे काहीच करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही हिंदुस्थानविरुद्ध युद्धाची सुरुवात करणार नाही, असा नरमाईचा सूर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता आळवला आहे.

सोमवारी पाकिस्तानातील शीख समुदायासमोर पंतप्रधान इम्रान खान बोलत होते. ते पुढे म्हणाले, पाकिस्तान आणि हिंदुस्थान दोन्ही राष्ट्रे अण्वस्रसंपन्न आहेत. त्यामुळे या दोन देशांमधील तणाव जगासाठी घातक आहे, पण युद्ध हे कोणत्याही समस्येवर उपाय ठरणार नाही. कारण युद्धात जिंकणाऱया देशालाही खूप काही गमकाके लागते. यादृष्टीने तोही पराभूत ठरतो. युद्धामुळे अनेक नव्या समस्यांचा जन्म होतो.

इम्रान खान यांनी यावेळी मोदींशी झालेल्या एका फोन चर्चेचा उल्लेख केला. ते म्हणाले, हिंदुस्थानशी चर्चा करून काही होणार नाही. मी जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनद्वारे असा चर्चेचा प्रयत्न केला, हिंदुस्थानने स्वतः सुपरपॉवर असल्याचा आव आणला आणि आम्हालाच आदेश दिले. वास्तवात कश्मीरप्रश्नी पाकिस्तान पूर्णपणे एकटा पडला आहे. संयुक्त राष्ट्रानेही हा त्या दोन देशांतला अंतर्गत वाद असल्याचे सांगत हात झटकले होते.

कश्मीर पाकिस्तानचे असल्याचे कोणतेच पुरावे नाही!

कश्मीर मुद्दय़ावरून हिंदुस्थानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची भाषा पंतप्रधान इम्रान खान करत असले तरी पाकिस्तानकडे कश्मीरसंबंधी पुरावेच नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे कोणत्या तोंडाने जायचे, असा घरचा आहेर पाकिस्तानी वकील खावर कुरेशी यांनी इम्रान सरकारला आज दिला. यामुळे पोकळ बाता करत हिंदुस्थानवर नरसंहाराचा आरोप करणारे इम्रान खान पुन्हा एकदा उघडे पडले. पाकिस्तानकडे कश्मीरबाबत सबळ पुरावेच नाहीत. त्यामुळे कश्मीरचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणे पाकिस्तानसाठी कठीण आहे, असेही कुरेशी यांनी पुढे स्पष्ट केले आहे.