सेक्स करताना मास्क घाला, वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसची साथ आल्यापासून मास्क घालणे हे दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. अनेकांना कोरोना व्हायरस सेक्समुळे पसरतो का अशी देखील चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र सेक्स मुळे कोरोना पसरत नसला तरी किंसिंगमुळे व मास्क न घालता जवळ आल्याने कोरोनाचा विषाणू पसरला जाऊ शकतो असे बोलले जाऊ शकतो अशी शक्यता कॅनडाच्या मेडिकल ऑफिसर डॉ. थेरेसा टॅम यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सेक्स करताना मास्क घाला असा सल्ला टॅम यांनी दिला आहे.

‘सेक्स मुळे कोरोना व्हायची शक्यता अगदीच कमी असली तरी किसींग, तोंडा जवळ तोंड आणणे अशा प्रकारामुळे कोरोनाचे विषाणू पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे सेक्स करताना खबरदारी म्हणून मास्क घाला’, असे टॅम यांनी सांगितले. कॅनडात सध्या 1,29,525 कोरोनाग्रस्त असून 9132 जणांचा मृत्यू झाला आहे.