वेब न्यूज – डाव्यांवर अन्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सतत बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बरोबरीने, आपोआपच त्या तंत्रज्ञानावरती आधारित असलेल्या गॅझेट्सवरदेखील त्याचा परिणाम होत असतो आणि त्या त्या बदल झालेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारी अधिक सुसज्ज असलेली गॅझेट्स बाजारात दाखल होत असतात. मात्र जुना काळ असो किंवा आधुनिक काळ तंत्रज्ञानाच्या जगात डावखुऱ्या लोकांवरती कायमच अन्याय केला जातो असे चित्र नेहमीच बघायला मिळते. 2017 साली सॅमसंगने बाजारात आणलेल्या आपल्या ‘गॅलॅक्सी एस 8’चा फिंगरप्रिंट स्कॅनर उजव्या बाजूला ठेवलेला होता. कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये उजव्या बाजूला तो होता. तर ‘नोट 8’ मोबाइलचे स्टाईलस्देखील उजवीकडे ठेवण्यात आलेले आहे. Appleसारख्या दर्जेदार आणि दिग्गज कंपनीचा ऍपल वॉचमध्ये त्याचा ‘digital crown’ मध्यभागी ठेवलेला नाही. ज्यामुळे डाव्या हाताच्या लोकांसाठी त्याचा वापर करणे बरेचदा त्रासाचेच ठरते. डावखुऱयांबरोबर होत असलेल्या या दुजाभावाची चर्चा पुन्हा एकदा जोर पकडण्याचे कारण म्हणजे, स्टिव्हन लेव्ही यांच्या ‘फेसबुक ः द इनसाईड स्टोरी’ या नव्याने येत असलेल्या पुस्तकातील उघड झालेली काही माहिती आहे. या पुस्तकात लेव्ही यांनी केलेल्या दाव्यानुसार एकेकाळी फेसबुकसारखी विख्यात कंपनी केवळ उजव्या हाताचे लोकच वापरू शकतील अशा तंत्रज्ञाने युक्त असा मोबाईल डिझाइन करण्याच्या प्रयत्नात होती. फेसबुकने मात्र आपण असले काही तंत्रज्ञान आणण्याच्या विचारात होतो, याचा पूर्वीपासूनच ठामपणे इन्कार केलेला आहे. स्टीव्हन लेव्ही यांच्या ‘फेसबुक ः द इनसाईड स्टोरी’मध्ये फेसबुकच्या काही माजी कामगारांची मतेदेखील नोंदवण्यात आली असून आपण त्या काळात पहिल्यांदाच फेसबुकसारख्या कंपनीला आपल्या अंतर्गत कर्मचाऱयांशीदेखील पहिल्यांदाच खोटे बोलताना, सत्य लपवताना पाहिल्याचे नमूद केले आहे. 2010 मध्ये आयफोन अस्तित्वात आल्यानंतर काही वर्षांनंतर फेसबुकने यावरती काम चालू केले होते. स्विस डिझायनर ‘Yves Béhar’ या aप्रोटोटाइप डिव्हाईसवरती काम करत होता आणि त्याने त्याला GFKअसे कोडनेम दिले होते. ‘Wu-Tang’च्या ‘Clan’s Ghostface Killah’वरून या कोडनेमची प्रेरणा घेण्यात आली होती.