
>> स्पायडरमॅन
तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच दोन पावले पुढे राहणाऱ्या दुबईने आता नोकरदार वर्गासाठी एक सुखद धक्का दिला आहे. दुबई नगरपालिकेने शहरात वर्क फ्रॉम पार्क ही अभिनव योजना सुरू केली असून यामुळे नोकरदारांना आता बंदिस्त चार भिंतींच्या ऑफिसमधून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात बसून काम करता येणार आहे.
दुबईतील प्रमुख सार्वजनिक उद्यानांमध्ये (उदा. अल मम्झार पार्क) ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. यात केवळ बागेत बसण्याची जागाच नाही, तर आधुनिक कामासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये हाय-स्पीड मोफत वाय-फाय, सोलर चार्ंजग स्टेशन्स आणि कामासाठी सोयिस्कर अशी स्मार्ट डेस्क देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही संपूर्ण यंत्रणा सौर ऊर्जेवर चालणारी असल्याने ती पर्यावरणपूरकही आहे.
सलग आठ-नऊ तास संगणकासमोर बसून काम केल्याने येणारा ताण कमी करण्यासाठी मोकळी हवा आणि हिरवळ अत्यंत प्रभावी ठरते. निसर्गाच्या सान्निध्यात काम केल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, असे अनेक संशोधनांतून समोर आले आहे. कोरोना काळानंतर जगभरात रिमोट वार्ंकगची संस्पृती रुजली आहे. दुबईला जगातील बेस्ट वर्क डेस्टिनेशन बनवण्यासाठी अशा सुविधा जागतिक स्तरावरील टॅलेंटला आकर्षित करत आहेत. दुबईला जगातील सर्वात आनंदी आणि स्मार्ट शहर बनवण्याच्या त्यांच्या व्हिजनचा हा एक भाग आहे.
स्वीडनसारखे देश जेव्हा शिक्षणात तंत्रज्ञान कमी करून पुस्तकांकडे वळत आहेत, त्याच वेळी दुबई तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी जीवन सुसह्य आणि आनंददायी करण्याचा प्रयत्न करत आहे. निसर्ग आणि तंत्रज्ञान यांचा हा मेळ भविष्यातील कार्यसंस्पृतीची नवी दिशा ठरणार आहे. एकूणच दुबईचा हा ‘वर्क फ्रॉम पार्क’ पॅटर्न लवकरच जगभर लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. आपल्या हिंदुस्थानातील पुणे, मुंबई, बंगळुरूसारख्या ठिकाणी अशी स्मार्ट डेस्क सुरू झाली तर या शहरातील आयटीयन्ससाठी ती नक्कीच एक मोठी पर्वणी ठरेल.


























































