‘शुभमंगल सावधान’ सुरू असताना आली ‘माझ्या नवऱ्याची बायको’… उडाला एकच गोंधळ

लग्न हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. मात्र, लग्नातच एखादी अपरिचीत व्यक्ती येते. ती म्हणते, हा विवाहसोहळा थांबवा, नवरदेवाशी माझे लग्न होणार आहे, अशा घटना घडल्यास काय होईल. मात्र, अशी घटना ब्रिटनच्या वेल्समध्ये घडली आहे. पती, पत्नी यांच्यामध्ये आलेली ‘ती’ कोण असा प्रश्न उपस्थितांना पडला आणि एकच गोंधळ उडाला.

ब्रिटनच्या वेल्समध्ये एका लग्न सोहळ्यात लग्न लागण्याच्या वेळेसच एक तरुणी नववधूच्या वेषात तयार होऊन आली. लग्न लागणार इतक्यात ती उठून उभी राहिली आणि म्हणाली की, हा विवाहसोहळा थांबवा. नवरदेवाशी माझे लग्न होणार आहे. या घटनेने एकच गोंधळ सुरू झाला. ही तुझी आधीची गर्लफ्रेंड आहे का असा प्रश्न वधूने नवऱ्याला केला. मात्र, आपण तिला ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे अचानक नवरदेवाशी माझे लग्न होणार आहे, असा दावा करणारी ही मुलगी कोण असा प्रश्न उपस्थित झाला. थोडासा गोंधळ झाल्यानंतर लग्नात काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने या कॉमेडियनला बोलावण्यात आल्याचे उपस्थितांना समजल्याने याचा खुलासा झाला.

आपल्या लग्नसोहळ्याला उपस्थितांना आश्चर्याचा धक्का देऊन त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आपण या कॉमेडियनला बोलावले असल्याचे लग्नातील मेड ऑफ ऑनर जॅकी लॅव्हीस सांगितले. या घटनेने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसण्याबरोबरच काही काळ गोंधळही निर्माण झाला होता. केरी नावाच्या युवकाचे स्टेसी ओवेनसोबत लग्न सुरू असताना ही अनोखी घटना घडली आहे. या लग्न सोहळ्यात मेड ऑफ ऑनर जॅकी लॅव्हीस होती. तिनेच लग्नसोहळ्यासाठी हा वेगळा इव्हेंट मॅनेज केला होता. यासाठी आपण कॉमेडियन रईससोबत पाच महिने तयारी केल्याचे तिने सांगितले. तसेच या घटनेतून फक्त आश्चर्याचा धक्का बसावा, गोंधळ किंवा नकारात्मक गोष्टी घडू नयेत, याचीही काळजी घ्यावी लागली, असे तिने सांगितले. हा सर्व इव्हेंट कोठे थांबवायचा आणि कॉमेडिला नक्की सुरुवात कशी आणि कधी करायची हे घटनेवरच अंवलंबून होते, असे तिने सांगितले. हा इव्हेंट करण्यासाठी आपल्याला कॉमेडियन रईसला समजवावे लागले. सुरुवातील असा इव्हेंट करण्याची तिची तयारी नसल्याचेही जॅकीने सांगितले. केरी आणि स्टेसीला आपल्या लग्नात काहीतरी वेगळे असावे असे वाटत होते. त्यासाठी आपण हा इव्हेंट मॅनेज केल्याचे जॅकीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या