आठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021

>> नीलिमा प्रधान

मेष – नोकरी टिकवा

या सप्ताहात मेषेच्या सुखस्थानात सूर्य, पंचमेषात शुक्र राशांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात मार्गी लागलेल्या कामात अडचणी निर्माण होतील. शुल्लक वाद वाढवू नका. प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा युक्तीने गोड बोलून तुमचे काम करून घ्या. प्रवासात सावध रहा. नोकरी टिकवा. नवीन परिचय होतील.
शुभ दिनांक – 13, 14

वृषभ – अनाठायी खर्च टाळा

या आठवडय़ात वृषभेच्या पराक्रमात सूर्य, सुखस्थानात शुक्र राशांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात तुमच्या खंबीर नेतृत्वाचे काwतुक होईल. गुरुवार, शुक्रवार कायदा मोडू नका. उद्योगधंद्यात किरकोळ अडचण येईल. नवीन ओळख नीट तपासून घ्या. कुटुंबात जबाबदारी घ्यावी लागेल. अनाठायी खर्च टाळा.
शुभ दिनांक – 11, 12

मिथुन – कठोर बोलणे टाळा

मिथुनेच्या धनेषात सूर्य, पराक्रमात शुक्र राशांतर होत आहे. अनेक योजनांना नवी दिशा देता येईल. विरोधाचा सामना करूनच पुढे जावे लागेल. योग्य सल्ल्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करा. फायदा करून घ्या. कठोर बोलणे टाळा. तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. कुटुंबात धावपळ होईल.
शुभ दिनांक – 11, 12

कर्क – लोकसंग्रह वाढेल

स्वराशीत सूर्य, कर्पेच्या धनेषात शुक्र राशांतर होत आहे. विचारपूर्वक आणि योजनाबद्ध कार्य करा. दिवस उत्साहवर्धक ठरेल. व्यवसायात वाढ होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येईल. लोकसंग्रह वाढेल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल.
शुभ दिनांक – 13, 14

सिंह – दगदग वाढेल

सिंहेच्या व्ययेशात सूर्य, स्वराशीत शुक्र राशांतर होत आहे. धावपळ, दगदग वाढेल. तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल. राजकीय-सामाजिक कार्यात राग वाढविण्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न केला जाईल. संयमी कृतीच यश देईल. वृद्ध व्यक्तीची मर्जी राखावी लागेल.
शुभ दिनांक – 16, 17

कन्या – मैत्रीत मतभेद

कन्येच्या एकादशात सूर्य, व्ययेशात शुक्र राशांतर होत आहे. जवळच्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यामुळे अस्वस्थ व्हाल. मनावर दडपण येईल. उद्योगधंद्यात तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. गुंतवणुकीची घाई करू नका. मैत्रीत मतभेद, गैरसमज होईल. नोकरीत मोहाला बळी पडू नका.
शुभ दिनांक – 11, 12

तूळ – नोकरीत वर्चस्व राहील

तुळेच्या दशमेशात सूर्य, एकादशात शुक्र राशांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. सामाजिक, राजकीय क्षेत्रात जनहिताची कामे प्रथम पूर्ण करा. मागील येणे वसूल करा. चित्रपट, कला, क्रीडा, साहित्यात प्रगतीची उत्तम संधी मिळेल. नोकरीत वर्चस्व राहील.
शुभ दिनांक – 11, 12

वृश्चिक – प्रत्येक दिवस उत्साहाचा

वृश्चिकेच्या भाग्येशात सूर्य, दशमेशात शुक्र राशांतर होत आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. प्रत्येक दिवस उत्साहाचा आणि आत्मविश्वासाचा असेल. दिलेला शब्द पाळावा लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कुटुंबातील त्रुटी भरून काढा. प्रवासाचा विचार कराल.
शुभ दिनांक – 11, 16

धनु – दुखापत संभवते

धनूच्या अष्टमेषात सूर्य, भाग्येशात शुक्र राशांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला दुखापत संभवते. सावध रहा. प्रवासात धोका पत्करू नका. व्यवसायात काम मिळेल. अडचणी येतील. इतरांनी केलेल्या चुका तुम्हाला त्रासदायक ठरतील. प्रकृतीची हेळसांड करू नका.
शुभ दिनांक – 13, 14

मकर – कुटुंबात खर्च वाढेल

मकरेच्या सप्तमेशात सूर्य, अष्टमेशात शुक्र राशांतर होत आहे. साडेसाती सुरू आहे. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. उतावळेपणा त्रासदायक ठरेल. व्यवसायात संमिश्र वातावरण राहील. प्रवासात काळजी घ्या. कुटुंबात खर्च वाढेल. मोह टाळा.
शुभ दिनांक – 11, 16

कुंभ – कामात चूक नको

पुंभेच्या षष्ठेशात सूर्य, सप्तमेशात शुक्र राशांतर होत आहे. या आठवडय़ात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. तटस्थ धोरण काही प्रसंगी ठेवावे लागेल. व्यवसायात तडजोड करावी लागेल. कामात चूक करू नका. नोकरीत दबाव राहील. कुटुंबात दगदग नकोशी वाटेल.
शुभ दिनांक – 11, 14

मीन – स्पर्धेत अव्वल राहाल

मीनेच्या पंचमेशात सूर्य, षष्ठेशात शुक्र राशांतर होत आहे. भावना व कर्तव्य यांचा ताळमेळ घालून निर्णय घ्या. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या कारस्थानाने मनस्ताप होईल. कोणत्याही व्यक्तीला कमी लेखू नका. अरेरावी टाळा. यश खेचून आणता येईल. स्पर्धेत अव्वल राहाल.
शुभ दिनांक – 11, 12

आपली प्रतिक्रिया द्या