साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 1 ते शनिवार 7 ऑगस्ट 2021

>> नीलिमा प्रधान

मेष – ध्येयावर लक्ष केंद्रित करा
बुध शनी प्रतियुती होत आहे. शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. प्रतिष्ठेचा विचार न करता ध्येयावर लक्ष केंद्रित करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्याने संबंध तयार होतील. कुटुंबात जबाबदारी घ्याल. नोकरीत अधिकाराऐवजी चातुर्याने निर्णय घ्या. स्पर्धा कठीण वाटेल पण यश मिळेल.
शुभ दिनांक – 3, 4

व़ृषभ – नवी संधी मिळेल
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, शनी प्रतियुती होत आहे. वाद वाढवू नका. व्यवसायात जम बसवता येईल. संधीची वाट पहा. नव्या दिशेने प्रगती कराल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या मुद्यांना महत्त्व प्राप्त होईल. सहकारी, नेते मंडळींना कमी लेखू नका. कला, क्रीडा,
साहित्यात प्रतिमा उजळेल.
शुभ दिनांक – 3, 4

मिथुन – विचारांना चालना मिळेल
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाची सुरुवात कटकटीची असेल. उद्योगधंद्यात वाढ होईल. नव्या विचारांना चालना देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानप्रतिष्ठा मिळाली तरी तुमच्या कामाबाबत चौकशी होईल. कला, साहित्यात चमकाल. शुभ दिनांक – 5, 6

कर्क – प्रगतिकारक काळ
बुध, शनी प्रतियुती, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायातील समस्या कमी होऊन नवी वाटचाल सुरु होईल. मनाप्रमाणे प्रगती होईल. मागील येणे वसूल होईल. वरिष्ठ व्यक्तीचा मान राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. जनहिताच्या दृष्टीने योजना तयार करा. कार्याचा गौरव होईल.
शुभ दिनांक – 1, 3

सिंह – निर्णयाबाबत सावध राहा
सूर्य, शनी प्रतियुती आठवडय़ाच्या शेवटी समस्या निर्माण करेल. शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. तुमच्यावर अधिकारी व्यक्तीचा दबाव राहील. कोणत्याही निर्णयाबाबत उतावळेपणा नको. उद्योग-धंद्यात करार करताना काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तडजोडीची भूमिका घ्यावी लागेल.
शुभ दिनांक – 3, 4

कन्या – अरागावर ताबा ठेवा
बुध, शनी प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. रविवारी मनाविरुद्ध घटना घडेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई नको. उद्योगधंद्यात तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. कर्जाच्या कामाला विलंब होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.
शुभ दिनांक – 4, 5

तूळ – किरकोळ अडचणी येतील
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरूवातीला किरकोळ अडचणी येतील. कामाला विलंब होईल. व्यवसायात स्थिरता आणता येईल. नियमांचे उल्लंघन करू नका. जनहिताच्या कार्यावर भर द्या. नवीन परिचय प्रेरणादायी ठरेल. स्पर्धेत प्रगती होईल.
शुभ दिनांक – 5, 6

वृश्चिक – शेअर्समध्ये गुंतवणूक करा
बुध, शनी प्रतियुती. सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. क्षुल्लक ताणतणाव झाले तरी त्यातून प्रगतीचा मार्ग काढता येईल. अधिकाराचा योग्य वापर करा. विरोधकांना चांगल्या प्रकारे शह देता येईल. आर्थिक देवाणघेवाण फायदेशीर ठरेल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा.
शुभ दिनांक – 2, 3

धनु – अडचणींकडे लक्ष द्या
सूर्य, हर्षल केंद्रयोग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. भावनेच्या भरात मदत करण्याऐवजी स्वतःच्या अडचणींकडे लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बोलण्याचा गैरअर्थ काढला जाईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. स्पर्धा सोपी वाटली असली तरी कलाटणी मिळेल.
शुभ दिनांक – 1, 5

मकर – वर्चस्व वाढेल
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, मंगळ केंद्रयोग होत आहे. जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. चांगले संबंध टिकवणे कठीण असते. त्यामुळे लोकप्रियता कमी होणार नाही याकडे लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील. सहकाऱयांना दुखवू नका. कलाक्षेत्रात नवीन गोष्टी करून दाखवाल.
शुभ दिनांक – 1, 3

कुंभ – कायद्याचे नियम पाळा
सूर्य, शनी प्रतियुती, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. तुमचा उद्देश चांगला असला तरी त्यातून चांगले निष्पन्न होण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत करावी लागेल. कायद्याचे नियम पाळा. शब्द जपून वापरा. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. कराराची घाई नको.
शुभ दिनांक – 1, 5

मीन – वाद वाढवू नका
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, शनी प्रतियुती होत आहे. क्षुल्लक वाद वाढवू नका. कुटुंबात चिंता राहील. कुणालाही दुखवू नका. नोकरीत वर्चस्व राहील. सहकारी वर्गाला समजून घ्यावे लागेल. नवीन परिचयात सावध रहा. कोणतीही कामे करताना मोह दूर ठेवा. योग्य मार्गदर्शन काम पूर्ण करा.
शुभ दिनांक – 1, 3

आपली प्रतिक्रिया द्या