साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 डिसेंबर 2022

>> नीलिमा प्रधान

मेष : मनोबल टिकून राहील
मेषेच्या भाग्येषात शुक्र, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. कठीण प्रसंगावर मात करण्याचा प्रयत्न करा. मनोबल टिकून राहील. नोकरीत तडजोड. धंद्यात नवा मार्ग मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपेक्षा न ठेवता कार्य करा. संधी मिळेल. अहंकाराची भाषा नको. कुटुंबातील समस्या सोडवाल.
शुभ दिनांक: 8, 9

वृषभ : गैरसमज उद्भवतील
वृषभेच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य, मंगळ प्रतियुती. आठवडय़ाच्या सुरूवातीला तणाव, वाद, गैरसमज उद्भवतील. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात गोड बोला. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरीष्ठांसोबत चर्चा करताना वाद होतील. प्रतिष्ठाा जपा. कुटुंबात खर्च वाढेल. प्रवासात सावध रहा.
शुभ दिनांक: 9, 10

मिथुन : अहंकार दूर ठेवा
मिथुनेच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. ताणतणाव निर्माण होईल. प्रसंगावधान ठेवा. दुखापत संभवते. नोकरीत सतर्क रहा. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरीष्ठांचे सहकार्य मिळवणे सोपे नाही. अहंकाराने नुकसान होईल. कुटुंबातील व्यक्तीची चिंता वाटेल.
शुभ दिनांक: 9, 10

कर्क : अधिकार लाभतील
कर्केच्या षष्ठsषात शुक्र, सूर्य, मंगळ प्रतियुती. आठवडय़ाच्या शेवटी तुमच्या अपरोक्ष गैरसमज पसरवला जाईल. व्यसन, मोह टाळा. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात हलगर्जीपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. कुटुंबात जबाबदारी वाढेल. जवळच्या व्यक्तीची नाराजी जाणवेल.
शुभ दिनांक: 4, 5

सिंह : चातुर्याने वागा
सिंहेच्या पंचमेषात शुक्र, चंद्र, बुध त्रिकोणयोग. चातुर्याने व स्नेहपूर्वक वागा. तरच कामे होतील. प्रेरणादायी घटना घडतील. नोकरीत नम्रपणे वागा. धंद्यात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या चुका दाखवून हल्लाबोल केला जाईल. कलाक्षेत्रात काम मिळेल.
शुभ दिनांक: 4, 5

कन्या : कामे मार्गी लावा
कन्येच्या सुखस्थानात शुक्र, सूर्य,मंगळ प्रतियुती. आठवडय़ाच्या सुरूवातीला वाद, तणाव होतील. महत्त्वाची कामे मार्गी लावा. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीधंद्यात उधारी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांसमवेत चर्चा यशस्वी होईल. कामे रेंगाळत ठेवू नका. स्पर्धेत यशस्वी ठराल.
शुभ दिनांक: 8, 9

तुळ : प्रवासात घाई नको
तुळेच्या पराक्रमात शुक्र, चंद्र, बुध त्रिकोणयोग. कठीण, महत्त्वाची कामे करा. प्रवासात घाई नको. नम्रता ठेवा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवा मार्ग मिळेल. मदत मिळेल. जमिन, घर, खरेदी, विक्री करता येईल. स्पर्धेत यश खेचून आणा.
शुभ दिनांक: 4, 5

वृश्चिक : संयम बाळगा
वृश्चिकेच्या धनेषात शुक्र, चंद्र, बुध प्रतियुती. आठवडा दगदग, धावपळीचा ठरेल. कामात आळस आणू नका. संयम ठेवा. मोठी कामे मार्गी लावा. नोकरीधंद्यात चांगला बदल होईल. शेअर्समध्ये लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानाचा किताब मिळेल. कला, क्रिडा, साहित्यात यश मिळेल.
शुभ दिनांकः 7, 8

धनु : परिचय उत्साहवर्धक ठरेल
स्वराशीत शुक्र, चंद्र, बुध प्रतियुती. अस्थिर न होता संयमाने कृती करा. विरोध सहन करा. पुढे चांगली संधी मिळेल. नोकरी टिकवा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दर्जेदार लोकांचा परिचय उत्साहवर्धक ठरेल. आर्थिक साहाय्य मिळवता येईल. कला, क्रिडा, साहित्याला चालना मिळेल.
शुभ दिनांक: 9, 10

मकर : अनाठायी खर्च टाळा
मकरेच्या व्ययेषात शुक्र, सूर्य, मंगळ प्रतियुती. संवाद साधणे कठीण वाटेल. वादाचे प्रसंग येतील. नम्र रहा. नोकरीधंद्यात काम वाढेल. खर्च होईल. अनाठायी खर्च टाळा. कोणत्याही गोष्टीचा मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. कामे मागे ठेवू नका. कामात आळस नको. कुटुंबात संयम राखून निर्णय घ्या.
शुभ दिनांक: 7, 8

कुंभ : स्पर्धेत प्रगती होईल
कुंभेच्या एकादशात शुक्र, चंद्र, बुध प्रतियुती. संयमाने प्रकरण हाताळा. यश मिळेल. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. कठीण प्रश्न मार्गी लावा. अनेकांचे सहकार्य मिळेल. नवे डावपेच लवकर तयार कराल. स्पर्धेत प्रगती होईल.
शुभ दिनांक: 4, 5

मीन : व्यापक यश मिळेल
मीनेच्या दशमेषात शुक्र, चंद्र, बुध प्रतियुती. प्रत्येक दिवस यशस्वी कराल. मेहन, जिद्द यावर अधिक व्यापक यश संपादन कराल. नोकरीत बढती मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकसंग्रह वाढेल. पदाधिकार मिळेल. कौटुंबिक कामे होतील.
शुभ दिनांक: 4, 5