वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया ठरू शकते जीवघेणी

2932

वाढतं वजन ही हल्ली सर्वसामान्य समस्या असली तरी वेळीच त्याच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचे आहे. कारण वजन एकट कधीच वाढतं नाही तर ते त्याच्याबरोबर डायबेटीस, उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, स्लिप एपनिया यासारखे आजार घेऊनच वाढत असतं. हे टाळण्यासाठी हल्ली अनेकजणांचा कल बॅरियाट्रीक सर्जरीकडे वाढत आहे. पण या सर्जरीमुळे तुमचे वजन जरी आटोक्यात येणार असले तरी त्याचे शरीरावर दुरगामी गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

या शस्त्रक्रियेत जठराच्या रचनेत काही बदल केले जातात. ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीला भूक लागत नाही. त्यामुळे जेवण कमी जाते आणि नकळत व्यक्ती कुपोषित दिसू लागते. पण त्यानंतर अनेक व्याधीही मागे लागतात. साधारणत बॅरियाट्रीक सर्जरीचे विविध प्रकार आहेत. रॉक्स एन वाय गॅस्ट्रीक बायपास, वर्टीकल स्लीव गॅस्ट्रेक्टॉमी आणि लेप्रोस्कोपिक अडजेस्टेबल गॅस्ट्रीक बँडींग अशी यातील काही शस्त्रक्रियांची नावे आहेत. व्यक्तीच्या स्थूलतेनुसार त्यावर यातील योग्य शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेनंतर भूक कमी होत जाते. व्यक्तीचे वजनही हळू हळू कमी होते. यामुळे शरीरात आवश्यक व्हिटामिन्सची कमतरता निर्माण होते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन अनेकांना संसर्गजन्य आजार होतात. जेवणच कमी झाल्याने इतर आवश्यक घटकांबरोबरच कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे रक्ताच्या कमतरतेबरोबरच अस्थिभंग, डायरिया, मुतखडा, हर्निया, गर्भाशयाचे आजार होतात. महिलांना  गर्भधारणेसही अडचणी येतात.

यामुळे ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते. मोजकाच पण सकस आहाराचा रोजच्या दैनंदिनीत समावेश करावा. व्यायाम करावा.

आपली प्रतिक्रिया द्या