कार्लसन, वेस्लीची अचूक चाल, हिंदुस्थानच्या हरिकृष्णाची सातव्या स्थानावर घसरण

हिंदुस्थानच्या पी. हरिकृष्णा याने ब्लिटझ् वनमध्ये मॅग्नस कार्लसन याला हरवत मोठा उलटफेर केला होता, पण ब्लिटझ् टूमध्ये त्याला आपला खेळ उंचावता आला नाही. नऊ फेऱयांमधून त्याला तीनच गुण मिळवता आले. त्यामुळे पी. हरिकृष्णा याला सेंट लुईस रॅपिड व ब्लिटझ् ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तपणे सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला मॅग्नस कार्लसन व अमेरिकेचा वेस्ली याने संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले. पी. हरिकृष्णा याला अखेरच्या फेरीत विजय मिळवता आला.

अमेरिकेच्या जेफ्री शिआँग याला त्याने पराभूत केले. या कालावधीत त्याला चार फेऱयांमध्ये हार सहन करावी लागली. तसेच तीन फेऱयांमध्ये ड्रॉवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जेफ्री शिआँगसोबत त्याची सातव्या स्थानावर घसरण झाली. त्याआधी झालेल्या बिल्टझ् वनमधील लढतीत पी. हरिकृष्णा याने मॅग्नस कार्लसन याला पराभूत करून मोठा विजय मिळवला होता.

  • मॅग्नस कार्लसन याने बिल्टझ टूमध्ये तीन विजय व पाच ड्रॉसह 24 गुणांची कमाई केली आणि पहिले स्थान पटकावले. पहिल्या स्थानावर राहिलेल्या मॅग्नस कार्लसन व वेस्ली यांना बक्षिसाच्या रूपात 45 हजार अमेरिकन डॉलर्स प्रदान करण्यात आले. तिसऱया स्थानावरील हिकारू नाकामुरा याने 21 गुणांसह 35 हजार अमेरिकन डॉलर्सची कमाई केली. पी. हरिकृष्णा याला 14 हजार अमेरिकन डॉलर्स मिळाले.
आपली प्रतिक्रिया द्या