भवानीपुरा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या भवानीपुरा विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजार 832 मतांनी पराभव केला आहे.


मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला भरघोस मतं मिळाल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. या मतदारसंघात 46 बिगर बंगाली भाषिक मतदार आहेत, त्यांनीही आपल्याला मत दिल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.


मीच मॅन ऑफ द मॅच

पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी आपला पराभव मान्य केला आहे. असे असले तरी आपणच मॅन ऑफ द मॅच असल्याचे सांगितले आहे, कारण ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात आपल्याला 25 हजारहून अधिक मतं मिळाली आहेत अशी प्रतिक्रिया टिबरेवाल यांनी दिली आहे.