पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या अल्पवयीन कार्यकर्त्याला बॉम्बने उडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नुकतेच उत्तर 24 परगना येथे एक घटना समोर आली आहे. जिथे एका 17 वर्षीय टीएमसी कार्यकर्त्याला बॉम्बने उडवण्यात आले आहे. टीएमसीने याचा आरोप सीपीआयएम आणि आयएसएफवर लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षांचा इमरान हसन यांनी मंगळवारी तृणमूल कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी झाला होता. ज्यामुळे देगंगा येथे बॉम्ब स्फोटात त्याचा मृत्यू झाला. टीएमसीने याचा आरोप सीपीआयएम आणि आयएसएफवर लावला आहे. याआधी दक्षिण 24 परगना परिसरात टीएमसी कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, हिसेंच्या विविध घटनांमध्ये एका टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे आणि एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची हत्या केली आहे. टीएमसी कार्यकर्त्याची ओळख जियारूल मोहल्ला (52) अशी झाली असून तो घरी येत असलताना त्याची हत्या करण्यात आली. तर मुर्शिबाद जिल्ह्यातील समशेरगंज येथे रविवारी रात्री कॉंग्रेस कार्यकर्ता आरिफ शेखला अज्ञात मारेकऱ्यांनी गोळी मारली, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे. स्थानिय पंचायत उमेदवारासाठी प्रचार करताना काही लोकांशी वाद सुरू असताना त्यांना गोळी लागली. ज्यानंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले.

याआधी पुरुलियामध्ये एका 45 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, बंकिम हंसदा यांचा मृतदेह घराजवळील शेतात मिळाला. ते रविवारी संध्यापासून बेपत्ता होते आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह रात्री उशीरा शेतात मिळाला.