पश्चिम रेल्वे ठप्प, रुळाला तडे गेल्याने वाहतूक रोखली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वांद्रे भागातील रुळांना तडे गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे, तर जलद मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. या खोळंब्यामुळे घरी परतणाऱ्या लोकांचे हाल होत असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे रेल्वे स्थानक भागाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने वाहतूक रोखण्य़ात आली आहे. याचा फटका बोरिवलीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्यांचा बसला आहे. तसेच जलद मार्गावरली वाहतूक देखील उशिराने सुरू आहे.