
सामना ऑनलाईन । मुंबई
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नायगाव आणि वसई स्थानकादरम्यान जलद मार्गावर लोकल गाड्या गेल्या ४० मिनिटांपासून खोळंबल्या आहेत. प्रवाशांनी खाली उतरून पायी प्रवास सुरू केला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत असून रेल्वेने अधिकृतरित्या काहीच स्पष्ट केले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
रविवारी मध्य आणि ट्रान्सहार्बवर मेगाब्लॉक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु पश्चिम रेल्वेची वाहतूक नेमक्या कुठल्या कारणाने विस्कळीत झाली हे कळायला मार्ग नाही.

























































