असं झालं तर…बँकेत स्वाक्षरी न जुळल्यास

बँकेतील कामांसाठी स्वाक्षरी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, परंतु बऱयाचदा काही लोकांची स्वाक्षरी जुळत नाही. त्यानंतर बऱयाच अडचणी येतात.

जर तुमच्या बाबतीतसुद्धा असेच काही झाले तर तुमच्या बँकेत जा. जाताना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा अन्य ओळखपत्र सोबत ठेवा.

बँकेतून स्वाक्षरी बदलण्याचा फॉर्म घ्या. तो व्यवस्थित भरा. तुम्हाला नव्या स्वाक्षरीचे अनेक नमुने या वेळी द्यावे लागतील. आपण कशी स्वाक्षरी करतो. हे ध्यानात ठेवा.

बँक तुमच्या नवीन स्वाक्षरीची नोंद करेल. सर्व व्यवहारांमध्ये तीच स्वाक्षरी वापरण्याचा प्रयत्न करा. स्वाक्षरी न जुळल्यामुळे चेक बाऊन्स होण्याचा धोका असतो.

वेळोवेळी तुमची स्वाक्षरी अपडेट करत राहा, जेणेकरून भविष्यात अडचण येणार नाही. डिजिटल युगात स्वाक्षरीचे नमुने बदलू शकतात. त्यामुळे सुसंगतता महत्त्वाची आहे.